हॅकरचे स्पेलिंग चुकले आणि ६७ अब्जांची चोरी टळली

hack
ऑनलाईन ट्रान्स्फर करताना स्पेलिंगची चूक झाल्यामुळे बांग्ला सेंट्रल बँकेतील ६७ अब्ज रूपये हॅकरच्या ताब्यात जाण्यापासून वाचल्याची घटना गतमहिन्यात घडली. अर्थात हॅकर्सना ५ अब्ज रूपये पळविण्यात यश आले असून त्यातील कांही पैसा परत मिळविला गेला असल्याचे सेंट्रल बँकेकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बांग्ला सेंट्रल बँक व न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँक यांच्यात हा ऑनलाईन ट्रान्स्फर व्यवहार झाला. हॅकर्सनी बँक सिस्टीम हॅक करून पेमेंट ट्रान्स्फर साठी गरजेचे असलेले कोडवर्ड चोरले. त्या सहाय्याने त्यानी फेडरल बँकेकडे ३० ते ३५ वेळा मनी ट्रान्स्फर साठी विनंती केली हे व्यवहार बांग्ला सेंट्रल बँक व फिलिपिन्स व श्रीलंका येथील लोकांच्या मध्ये असल्याचे भासविले गेले होते. त्यानुसार फेडरल बँकेने ५ अब्ज रूपये ट्रान्स्फर केलेही. मात्र फिलिपिन्समधील ज्या एका एनजीओसाठी १ अब्ज ३५ कोटी ट्रान्स्फर करायचे होते त्या संस्थेच्या नावाचे स्पेलिंग चुकले होते. रूटीन चेकींगसाठी बांग्ला सेंट्रल बँकेकडे फेडरल बँकेने स्पष्टीकरण मागविले तेव्हा बांग्ला बँक अधिकारी सतर्क झाले आणि ही चोरी उघडकीस आली. यामुळे पुढची ६७ अब्ज रूपयांची रक्कम हॅकर पळवू शकले नाहीत.

Leave a Comment