वेरूळच्या लेण्यांचे गांजाने केले संरक्षण

ajntha
औरंगाबाद – पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना वेरूळच्या लेणी व गुहांमधली कला १५०० वर्षे सुस्थितीत राहण्यामागे गांजा असल्याचे आढळले असून या लेण्यांच्या लेपासाठी माती व चुनकळीबरोबरच गांजाचा वापर करण्यात आल्याचे पुरातत्व खात्याच्या अभ्यासात दिसून आल्यामुळे लेणी व चित्रे अजूनही शाबूत राहिली आहेत.

याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या विषयावर रसायन शास्त्रज्ञ राजदेव सिंग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बॉटनीचे प्राध्यापक एम. एम. सरदेसाई यांनी संशोधन केले आहे. या विषयावर मार्चच्या विज्ञान अहवालात माहिती देण्यात आली आहे.

लेपामध्ये माती व चुनकळीबरोबर गांजा किंवा भांग यांचा समावेश करण्यात आल्याचे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फोरियर ट्रान्सफॉर्म, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी व स्टिरीओ मायक्रोस्कोप या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर सिद्ध झाले आहे. वेरूळमध्ये आढळलेल्या पदार्थांशी जालना व दिल्ली येथील गांजाच्या नमुन्यांची तुलना करण्यात आली आणि यावर शिक्कामोर्तब झाले. वेरूळमधल्या लेपांसाठी वापरलेल्या नमुन्यामध्ये गांजाचे प्रमाण १० टक्के आढळले आहे. यामुळे वेरूळच्या लेण्यांचे दीड हजार वर्षे जीवजंतूंपासून रक्षण झाले असावे असा अंदाज आहे.

Leave a Comment