दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ

two-wheeler
मुंबई : मागील महिनाभरात देशातील चारचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये चार टक्क्यांची घट झाली असून दुचाकी वाहनांच्या विक्रीत ११ टक्क्यांची वाढ झाली आहे.

देशांतर्गत गेल्या १५ महिन्यांमध्ये मोटार विक्रीत सलग दुसऱ्यांदा घसरण नोंदविण्यात आली आहे. इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीने (सियाम) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात दुचाकी गाड्यांची विक्री ११.०५ टक्क्यांनी वाढली आहे. देशात या काळात ८ लाख ५९ हजार ६२४ दुचाकी विकल्या गेल्या. गेल्यावर्षी याच काळात देशात ७ लाख ७४ हजार १२२ दुचाकींची विक्री झाली होती. देशात फेब्रुवारी महिन्यात एकूण १ लाख ६४ हजार ४६९ मोटारींची विक्री झाली आहे. देशांतर्गत व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत १९.९३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Leave a Comment