‘इस्त्रो’च्या सहाव्या नेविगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

irnss
श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्त्रो’चा आयआरएनएसएस-१ एफ हा सहावा उपग्रह येथील सतीश धवन अंतरीक्ष केंद्रातून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला. अवकाशातील धुळीमुळे या उपग्रहाचे प्रक्षेपण एक मिनिट उशीरा करण्यात आले.

‘अमेरिकन ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’प्रमाणे नेविगेशन सुविधा देण्याच्या उद्देशाने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. यापूर्वी इस्त्रोने भारतीय क्षेत्रीय नेविगेशन उपग्रह प्रणाली या प्रकल्पांतर्गत पाच उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी चार उपग्रह पुरेसे असून इतर तीन उपग्रह या प्रणालीच्या अचूकतेत वाढ करतील.

चार उपग्रहांमुळे १८ तासापर्यंत नेविगेशन करण्याची या प्रणालीची क्षमता पाचव्या उपग्रहामुळे २४ तास झाली आहे. या प्रकल्पांतर्गत सात उपग्रह सोडण्यात येणार असून पुढील उपग्रह या महिन्याच्या अखेरीला सोडण्यात येईल.

Leave a Comment