महाग होणार थर्ड पार्टी इन्शुरन्स

insurance
नवी दिल्ली – आता आपल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स करणे आणखी महाग होणार असून १ एप्रिल पासून इन्शुरन्स नियामक आपले नवीन दर लागू करणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍन्ड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) च्या मसुदा प्रस्तावामध्ये काही श्रेणींमध्ये जवळपास ३० टक्के वाढ करण्यात आली आहे.

व्यावसायिक वाहनांसाठी २५ ते ३० टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. व्यवसाय करणा-या वाहनांच्या श्रेणीसाठी क्लेम वाढविण्यात आला आहे. यामध्ये राज्यात एका वर्षामध्ये दीड ते ३ लाख किलोमीटर चालणा-या २ ते ७.५ टनचे ट्रक आणि वर्षभरात ४ लाख किलोमीटर चालणारे ७.५ ते १२ टन असणा-या ट्रकचा समावेश असल्याचे एसबीआय जनरल इन्शुरन्सचे मुख्य पुनीत साहनी यांनी म्हटले आहे.

आयआरडीएआयच्या मसुद्यानुसार, ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन असणा-या दुचाकी वाहकांच्या इन्शुरन्समध्ये १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच ३५० सीसीच्या वर असणा-या दुचाकी वाहकांच्या इन्शुरन्समध्ये १० टक्के कपात करण्यात येणार आहे.

Leave a Comment