बीएमडब्ल्यूची नेक्स्ट १०० कन्सेप्ट कार

next-100
बीएमडब्ल्यू या जर्मन कार उत्पादक कंपनीने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त म्युनिक येथील ऑटो शो मध्ये त्यांची कन्सेप्ट कार सादर केली आहे. आतिशय देखण्या आणि लाजवाब फिचर्स असलेल्या या कारचे नामकरण व्हीजन नेक्स्ट १०० असे केले गेले आहे. ही कार चालविणार्‍याला आरामदायी ड्रायव्हींगचा अनुभव १०० टकके मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

ही कार दोन ऑप्शनमध्ये ड्राईव्ह करता येणार आहे. म्हणजे चालकाचा कंट्रोल ठेवून तसेच व्हेईकल कंट्रोलनेही ती चालविता येईल. व्हेईकल कंट्रोल मोडवर कारचा कंट्रोल पूर्णपणे ऑटोमॅटिक पद्धतीने होईल. रस्त्यातील वळणे येताच स्टीअरिंग आपोआप वळेल. व्हेईकल कंट्रोल मोडवर असताना चालक अन्य कांही कामेही निर्धास्तपणे करू शकेल. या दशकाअखेर अशा प्रकारच्या कार बाजारात येतील असे सांगितले जात आहे.

नेक्स्ट १०० ही इलेक्ट्रीक कार असून त्याला चार बटरफ्लाय डोअर्स आहेत. ही दारे सेन्सरयुक्त आहेत. कारची चाके फ्लेक्झिबल आहेत. थ्रीडी मेसेजेस च्या सहाय्याने अन्य चालकांना सूचना देता येतील व त्यासाठी वॉर्निंग लाईट अथवा एलईडी स्क्रीनची गरज भासणार नाही.

Leave a Comment