फेसबुकची चूक दाखवली आणि मिळाले १० लाख

anand-prakash
बंगळूरु – फेसबुकच्या चुका दाखविल्याने बंगळूरुमधील एका प्रोग्रामरला दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. विशेष म्हणजे या प्रोग्रामरने आतापर्यंत फेसबुक आणि ट्‌विटरला वेगवेगळ्या चुका दाखवून १ कोटी पेक्षा अधिक रकमेचे बक्षीस कमावले आहे.

फ्लिपकार्टमध्ये सिक्‍युरिटी इंजिनिअर म्हणून काम करणारा आनंद प्रकाश या २२ वर्षीय तरुणाने फेसबुकवरील कोणत्याही युजरचे खाते हॅक करता येत असल्याची त्रुटी त्याने फेसबुकला दाखवून दिली. त्यासाठी त्याने अनेकदा प्रयत्न केले. मी यासाठी ब्रुट फोर्स अल्गोरिदमचा वापर केला. ही पद्धत वापरून कोणीही अगदी सहजपणे एखाद्याच्या फेसबुक खात्यात प्रवेश करू शकतो, असे आनंदने सांगितले. आपल्या ब्लॉगमध्ये माहिती देताना त्याने म्हटले की, अशाप्रकारे एखाद्याचे खाते हॅक करून त्यातील डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती, खाजगी चित्रे, संदेश आदी सर्व प्रकारची माहिती सहजपणे पाहता येणे शक्‍य आहे. त्याने दाखवून दिलेल्या या चुकीबद्दल फेसबुकने त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे.

Leave a Comment