झेडटीईचा ताकदवार बॅटरी असलेला ब्लेड डी २

zet
झेडटीई या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने गेल्या महिन्यात बार्सिलोना मोबाईल परिषदेत व्ही सेव्हन व ब्लेड व्ही सेव्हन हे दोन मिडरेंज स्मार्टफोन सादर केल्यानंतर आता लगेचच नवा ब्लेड डी टू स्मार्टफोन लाँच केला आहे. ४००० एमएएचची ताकदवार बॅटरी हे या फोनचे खास वैशिष्ठ्य आहे. या फोनच्या सहाय्याने अन्य फोनची बॅटरीही चार्ज करता येईल असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन कंपनीने त्यांच्या व्हिएतनाम वेबसाईटवर लिस्ट केला असून त्याची रूपयांत किंमत आहे ८१०० रूपये.

या फोनची बॉडी प्लॅस्टीकची आहे. त्याला ५ इंची आयपीएस डिस्प्ले दिला गेला आहे. हा फोरजी फोन असून वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस, मायक्रो यूएसबी कनेक्ट सपोर्ट दिला गेला आहे. फोनची रॅम १ जीबी आहे. अँड्राईड ५.० लॉलीपॉप ओएस, ८ जीबी स्टोरेज कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५एमपीचा रियर एलईडी फलॅशसह कॅमेरा, २ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment