केदारनाथ मंदिराचे दरवाजे ९ मे रोजी उघडणार

kedarnath
रुद्रप्रयाग – महाशिवरात्रीच्या दिवशी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक केदारनाथ मंदिराचा दरवाजा उघडण्याचा मुहुर्त घोषित करण्यात आला असून भाविकांना ९ महिन्यासाठी केदारनाथच्या दर्शनासाठी मंदिराचा दरवाजा उघडा राहणार आहे. केदारनाथच्या उत्सवाची पालखी पाच मे या दिवशी शीतकालीन उशीमठाच्या ओंकारेश्वर मंदिरापासून निघणार आहे. यावेळी गंगोत्री-यमुनोत्री मंदिरांचे दरवाजेसुद्धा ९ महिन्यांसाठी उघडे राहणार आहेत. बदीनाथचे दरवाजे १२ मे या दिवशी उघडणार आहेत. ओंकारेश्वर मंदिरात केदारनाथाच्या रावळासहित भीमाशंकर लिंग, बदरी केदार मंदिराचे पदाधिकारी, वेदपाठक, हक्कदार, आणि तीर्थपुरोहितांच्या उपस्थितीत ब्राह्मणांनी पंचांगानुसार दरवाजा उघडण्याची शुभतिथी सांगितली.

५ मे रोजी बाबा केदारची उत्सव पालखी गुप्तकाशीला जाईल आणि विश्वनाथ मंदिरात रात्रीचा मुक्काम करून ६ मे रोजी फाटा येथे जाणार आहे. ७ मेला गौरीकुंड झाल्यानंतर ८ मे या दिवशी सायंकाळी पालखी केदारनाथ या ठिकाणी जाणार आहे. ९ मे च्या दिवशी ७ वाजता शुभमुहूर्तावर मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतील अशी माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. डी. सिंह यांनी दिली.

Leave a Comment