इंटरनेट वापरात महिलाच अव्वल

internet
नवी दिल्ली – जाएंट सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल‘ने भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांकडून इंटरनेटचा अधिक वापर होत असल्याची माहिती दिली आहे. विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतातील स्त्रीया विशेषत: माता सौंदर्यापासून फॅशनपर्यंत आणि आरोग्यपासून फिटनेसपर्यंतच्या माहितीचा शोध घेण्यासाठी इंटरनेटचा अधिक वापर करतात. भारतातील प्रत्येक तीन मातांपैकी एक माता इंटरनेटचा वापर करते. तर चारपैकी केवळ एकच पिता इंटरनेटचा वापर करतो. भारतातील स्त्रियांचे जीवनमान बदलण्यात इंटरनेट महत्वाची भूमिका बजावत आहे. पुरुषांपेक्षा महिलांनी इंटरनेटवर अधिक वेळ खर्च करणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे मत “गुगल‘ने व्यक्त केले आहे. तसेच हे प्रमाण भविष्यात वाढण्याची शक्‍यताही व्यक्त केली आहे.

Leave a Comment