रोमॅटिक शहरात फिरा, पण मुले जन्माला घाला

denmrk
भारत, चीन या सारख्या देशात लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी विविध बक्षीसांची लालूच दाखविली जात असते तर डेन्मार्कसारख्या अनेक देशांतून अधिक संख्येने मुले जन्माला यावीत यासाठी विविध बक्षीसे दिली जातात. डेन्मार्कमध्ये सध्या जन्मदर इतका कमालीचा घटला आहे की घरे, रस्ते, उद्याने सुनसान पडली आहेत कारण येथे लहान मुले अत्यंत कमी संख्येने आहेत. येथील वृद्धांची संख्या मात्र वाढती असून त्यामुळे या देश वेगाने वयस्कर होत चालला आहे.

ब्रिटनच्या थॉमस कूक ट्रॅव्हल कंपनीच्या डेन्मार्क शाखेने डू इट फॉर डेन्मार्क नावाने जोडप्यांसाठी अशीच एक खास योजना जाहीर केली आहे. त्यानुसार पॅरिस सारख्या रोमँटिक शहरात प्रवासासाठी जा, आणि प्रेग्नन्सी पॉझिटीव्ह आल्यास प्रवासाची माहिैती देऊन तीन वर्षांसाठी बाळाच्या नॅपी फ्री मिळवा शिवाय फॅमिली हॉलीडे मोफत घ्या अशी ही योजना आहे. नुकत्याच झालेल्या सवेक्षणानुसार सुटींच्या दिवसात स्त्रीपुरूष अधिक वेळा एकत्र येतात असे दिसून आले आहे. परिणामी या काळात जनसंख्येत होणारी वाढ १० टक्कयांवर असल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यामुळे अशा विविध योजना जाहीर केल्या जात आहेत.

Leave a Comment