रिवॉर्ड पॉर्इंट देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन लूट

online
नवी दिल्ली : ऑनलाईन किंवा शोरूममधून खरेदीवर ग्राहकांना क्रेडीट कार्ड आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून भरमसाठ सूट देण्याचे तसेच रिवॉर्ड पॉर्इंट देण्याचे आमिष दाखवून बहुतांश कंपन्या ग्राहकांची प्रचंड लूट करीत असल्याचे वास्तव विविना विश्वनाथन यांच्या अहवालातून समोर आले आहे.

एखाद्या रकमेची वस्तू खरेदी केल्यानंतर तात्काळ रोख रक्कम आपणास काही प्रमाणात मिळेल, अशा पद्धतीचे आमिष बहुतांशी क्रेडीट कार्ड किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून खर्चावर दिले जात आहेत. एखादी कोणती कंपनी १ हजार रुपयांच्या खरेदीवर २०० रुपये कॅशबॅकची ऑफर देत असेल तर ते क्रेडिट कार्डद्वारे खरेदीदारीच्या प्रकरणात ही रक्कम क्रेडिट कार्डमध्ये परत केली जाते. अ‍ॅपच्याबाबतीत माहिती अ‍ॅपमध्ये दिली जाते. ही रक्कम तात्काळ मिळणार नाही आणि अनेक वेळा ही रक्कम मिळण्यास दोन महिनेही लागू शकतात. प्रवाशांसाठीचे पोर्टल, ऑनलाईन ग्राहक, उत्पादन विकणा-या कंपन्या आणि बँका अशा पद्धतीच्या ऑफर दिल्या जातात.

अ‍ॅक्सिस बँक आपल्या सिग्नेचर क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना सिनेमाचे तिकिट के्रडिट कार्डद्वारे खरेदी केल्यावर ५० टक्के पर्यंतचे कॅशबॅक देते. मात्र ही रक्कम के्रडिट कार्डमध्ये जात नाही तर क्रेडिट कार्डच्या बिलातून ती रक्कम कपात केली जाते. ग्राहकांनी खरेदी करताना मिळणारे रिवॉर्ड पॉर्इंटला रुपये समजण्याची चूक करू नये. एका रिवॉर्डची किंमत २० किंवा २५ पैसे असते. अशात १०० रुपये खर्चावर एक रिवॉर्ड प्वार्इंटचा अर्थ २५ पैसे आहे. अशा रितीने ४०० रुपये खर्च केला किंवा खरेदी केली तर केवळ १ रुपया बचत होते.

Leave a Comment