मारुतीने लॉन्च केली ‘विटारा ब्रेजा’

maruti
नवी दिल्ली – आपली पहिली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ‘विटारा ब्रेजा’ला मारुती सुझुकीने आज अधिकृतरित्या बाजारात उतरवले असून या गाडीची किंमत ६.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) एवढी आहे. या गाडीला सर्वप्रथम दिल्लीच्या ऑटो एक्सपो २०१६ शोकेसमध्ये सादर केले गेले होते. सर्वप्रथम या गाडीचे १.३ लीटर डीजेल इंजिनवाले मॉडेल बाजारात उतरवले आहे. त्यानंतर त्याचे पेट्रोल मॉडेल बाजारात दाखल होईल. ५-स्पीड मॅन्यूअल गिअरवाले १.३-लीटर डीजेल इंजिन देण्यात आले आहे.

या गाडीचे वैशिष्टय म्हणजे विटारा ब्रेजा हि मारुतीची पहिलीच सब-कॉमपॅक्ट एसयूव्ही कार आहे आणि हि गाडी तयार करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागला आहे. या गाडीचे ९८टक्के काम भारतात झाले आहे. हि सब-कॉमपॅक्ट एसयूव्ही गाडी ६ वेरिएंट उपलब्ध असेल ज्यात एलडीआय, एलडीआय (ओ), व्हिडीआय, व्हिडीआय (ओ), झेडडीआय झेडडीआय+चा समावेश आहे.

यात एबीएस, ईबीडी और डुअल फ्रंट एअरबॅग सारखे सुरक्षा फीचर्सला ऑप्शनल बनविण्यात आले आहे. व्हीडीआय ट्रिम-लेवलमध्ये ड्रायव्हर साइडला एअरबॅग सारख्या स्टँडर्ड फीचरचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत या गाडीची इकोस्पोर्ट आणि महिंद्रा टीयूव्ही ३००शी स्पर्धा असेल.