रे टॉमिल्सन नाही; मी लावला आहे ईमेलचा शोध – शिवा अय्यादुराई

email
वॉशिंग्ट्न: भारतीय वंशाचे शिवा अय्यादुराई यांनी मी खालच्या जातीचा, कृष्णवर्णीय आणि भारतीय असल्यामुळे मला ई-मेलच्या निर्मितीचे श्रेय दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे. ई-मेलचे जनक रेमंड टॉमलिन्सन यांचे निधन झाले. त्यानंतर अय्यादुराई यांनी ही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी दावा केला आहे की, ईमेलचा शोध मी लावल्यामुळे याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.

वयाच्या सातव्या वर्षीच मुंबईचे रहिवाशी असलेले शिवा अय्यादुराई हे कुटुंबासोबत अमेरिकेला गेले होते. तिथेच त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी १९७८ मध्येच ई-मेल नावाच्या एका प्रोग्रॅमची निर्मिती केली होती. आज ई-मेलमध्ये असलेले बहुतेक फिचर्स त्यांच्याही प्रोग्रॅममध्ये असल्याचे त्यांचे म्हणने आहे. यासाठी त्यांना १९८२ मध्ये अमेरिकन सरकारने ई-मेलचे कॉपीराईट देऊन ई-मेलचा निर्माता असल्याचे शिक्कमोर्तबही केले होते, असे ते म्हणाले.

नुकतेच ई-मेलचे जनक टॉमिलन्सन यांचे निधन झाले आणि त्यांना जीमेलने ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहीली होती. त्यावर शिवा यांनी संताप व्यक्त करत या गोष्टीचा खुलासा केल्यामुळे आता याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Leave a Comment