मर्सिडीजची सर्वाधिक सुरक्षित मेबॅक एस-६०० बाजारात

maybach-s-600
मुंबई: भारतातील सर्वाधिक महाग मात्र सर्वाधिक सुरक्षित अशी ‘मे बॅक-६००’ ही कार ”ने भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केली आहे. या बुलेटप्रूफ कारची किंमत तब्बल साडेदहा कोटी रुपये आहे. या शिवाय या वर्षात मर्सिडीज १२ नवीन मॉडेल्स भारतात आणणार आहे.

जगात सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या गाडीला व्ही-१० सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या गाडीवर गोळीबार, बॉम्ब, स्फोट या कशाचाही परिणाम होत नाही. या गाडीची अंतर्गत रचनाही आकर्षक आहे. गाडीच्या विंडस्क्रीनवर पॉलीकार्बोनेट कोटींग करण्यात आले आहे. गाडीतील ‘अंडर बॉडी आर्मर’मुळे ही गाडी अधिक सुरक्षित झाली आहे.

या गाडीवर गॅस हल्ल्याचाही कोणताही परिणाम होत नाही. गाडी पूर्ण बंद असूनही ताजी हवा आतील प्रवाशांना उपलब्ध करून देणारी यंत्रणा या गाडीत आहे. ऑलराउंड रिअर, हीटेड विंड स्क्रीन, साईड विंडोजना ‘पॅनिक अलर्ट’ यंत्रणा बसविण्यात आली आहे.

ज्या व्यक्तींना अधिक सुरक्षा आवश्यक आहे; त्यांनाच नजरेसमोर ठेऊन ही गाडी विकसित करण्यात आली आहे. या गाडीचे टायरदेखील वैशिष्ट्यपूर्ण असून पंक्चर झाल्यावरही ३० किलोमीटर वेगाने १८ मैलांचा प्रवास करणे शक्य आहे. इंधनाची टाकी गळणे आपोआप दुरुस्त करणारी यंत्रणाही या गाडीत आहे.

या कराचे वजन ४.७ टन आहे. ६.० लीटर क्षमतेचे ट्विन टर्बो वी १२ ३ बीएचपी क्षमतेचे आणि ८३० एनएम टॉर्क असलेले इंजिन या गाडीला बसविण्यात आले आहे. वजन अधिक असूनही ही गाडी केवळ ७.९ सेकंदात ० पासून ताशी १०० किमी वेग पकडू शकते. १९० किलोमीटर प्रती तास हा गाडीचा सर्वाधिक वेग आहे.

Leave a Comment