टीशर्ट दाखवेल तुमच्या हृदयाची धडकन

tshirt
लंडन येथील संशोधकांनी आपल्या शरीरातील अवयव कसे काम करतात हे याची देही याची डोळा पाहण्यासाठी एक टी शर्ट तयार केला असून त्याचे नामकरण व्हर्च्युअल टी अॅन्ड यू असे केले गेले आहे. हा टी शर्ट एक्सरे मशीनप्रमाणे काम करणार आहे. तो मोबाईल अॅपच्या सहाय्याने हँडल करता येणार आहे.

हा टी शर्ट मोबाईल अॅपला जोडता येतो व त्यामुळे तुम्ही टी शर्ट अंगात घातला की हातातल्या मोबाईलमध्ये तुमच्या शरीराच्या आतील अवयवांचे काम कसे सुरू आहे हे पाहता येते. त्यात हृदय कसे धडकते आहे हेही दिसू शकणार आहे. हे अॅप गुगल कार्डबोर्ड शी जोडता येते त्यामुळे शरीरातील अवयव ३६० अंशातूनही पाहता येतात. क्रू स्कोप कंपनीने हा टीशर्ट तयार केला आहे. त्याचा सर्वाधिक फायदा वैद्यकीय शिक्षण घेणार्‍यांना होऊ शकणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment