आयसीआयसीआयची महिलांना घरून काम करण्याची सुविधा

icici
खासगी क्षेत्रातली अग्रणी आयसीआयसीआय बँकेने महिला दिनामिमित्त बँकेतील महिला कर्मचार्‍यांना वर्क फ्रॅाम होम सुविधा भेट म्हणून दिली आहे. अशी संधी देणारी आयसीआयसीआय ही खासगी क्षेत्रातील पहिलीच बँक आहे. आय वर्क अॅट होम असे या सुविधेचे नामकरण केले गेले असून तिचे उद्घाटन महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना कोचर म्हणाल्या की बाळंतपण, मुलांचा सांभाळ अथवा बँक घरापासून दूर असल्याने येण्याजाण्याचा त्रास असेल तर बरेचवेळा महिला नोकरी सोडण्याचा विचार करतात. त्यांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत बँकेचे कर्मचारी घरूनच लॉग इन करू शकणार आहेत. त्यासाठी फेस रेकग्नीशन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. ज्या कर्मचार्‍यांना ग्राहकांशी थेट बोलण्याची गरज नाही ती कामे या पद्धतीने करता येणार आहेत. बँकेतील ५० महिला याप्रकारे आधीपासूनच काम करत आहेत व घरून काम करण्याची विनंती करणारे १२५ अर्ज बँकेला मिळाले आहेत. या योजनेअंतर्गत ५०० महिलांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

स्टेट बँकही बँकेचे रिलेशनशीप मॅनेजर या प्रकारे वर्क फ्रॉम होम योजनेतून घरून काम करू शकतील याची तयारी करत असल्याचे बँकेच्या प्रमुख अरूंधती भट्टाचार्य यांनी सांगितले.

Leave a Comment