अॅपलने भारतात सेकंडहँड फोन विक्रीची मागितली परवानगी

iphones
अॅपल इंकने त्यांचे इम्पोर्टेड प्री ओन्ड सर्टिफाईड आयफोन भारतीय बाजारात विकण्यासाठी पर्यावरण वन मंत्रालयाकडे अर्ज केला असल्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. या अर्जावर अद्यापी निर्णय घेतलेला नाही मात्र अॅपलला त्यांचा भारतीय बाजारातील हिस्सा वाढविण्यासाठी असा प्रयत्न करायचा आहे असे ते म्हणाले. अॅपलसाठी भारताची बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची असल्याने असा प्रस्ताव दिला गेला आहे.

यानुसार अॅपल त्यांचे जुने फोन दुरूस्त करून त्यांची कांही ठरविक बाजारात विक्री करणार आहे. गतवर्षीही असा प्रस्ताव अॅपलकडून आला होता. त्यावेळी जुने १ लाख आयफोन व अडीच लाख आयपॅड विकण्यची परवानगी मागितली गेली होंती. मात्र त्यावेळी यामुळे भारतातील इलेक्ट्रॅनिक कचरा वाढेल म्हणून अशी परवानगी दिली गेली नव्हती. त्याचवेळी तीन वर्षांपेक्षी कमी जुने व किमान पाच वर्षे चालू शकतील असे फोन आयात करण्यास परवानगी मिळू शकेल असे अॅपलला सांगितले गेले होते. त्याचा फायदा घेऊन अॅपलने नवा अर्ज सादर केला आहे.

Leave a Comment