सर्दीवरचे साधे सोपे घरगुती उपचार

sneez
आपल्याला कधी कधी काही कारण नसताना सर्दी होते आपण थंड पेय प्राशन केलेले नसते, थंडी वाजलेली नसते आणि सर्दी व्हावी असे काही घडलेले नसते. तरीही सर्दी होते. अशा सर्दीचे कारण काही समजत नाही. केवळ सर्दीच नव्हे तर कधी कधी थकल्यासारखे वाटते. कारण काही समजत नाही. अशावेळी एक खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे की असे कारण नसताना होणारे आजार हे शक्यतो हवामानात होणार्‍या बदलामुळे होत असतात. हिवाळ्यातून उन्हाळ्यात जाताना किंवा उन्हाळ्यातून पावसाळ्याकडे जाताना येणार्‍या संधीकालामध्ये हमखास सर्दी होते. अशावेळी आपण डॉक्टरकडे जाऊन औषधे घेतो मात्र औषधे घातक असतात. सर्दीसाठी फार औषधे घेण्याची गरज नाही. सर्दीवर काही सोपे घरगुती उपचार आहेत. ते करावेत.

१. गरम पाण्याच्या गुळण्या करणे आणि गुळण्या करताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकणे. या गुळण्यांमुळे खवखवणारा घसा हमखास दुरूस्त होतो. २. सतत चहा, कॉफी अशी गरम पेये पिणे किंवा कोमट पाणी पित राहणे. ३. असे गरम पाणी पिताना त्या पाण्यामध्ये थोडा मध, थोडी हळद, सुंठीची पावडर टाकावी असे पाणी पिल्याने सर्दी तर कमी होतेच पण अंग दुखणे आणि डोकेदुखीसुध्दा कमी होते.

४. सर्दीवरचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ श्‍वासातून आत घेणे. एका छोट्या पातेल्यात गरम पाणी घ्यावे. या पाण्याच्या वाफा येत असाव्यात. अशा पाण्याचे भांडे जमिनीवर ठेवून त्याच्यावर वाकून वाफा श्‍वासातून आत घ्याव्यात. अशावेळी डोक्यावरून टॉवेल पांघरूण घ्यावा म्हणजे वाफा बाहेर जाणार नाहीत. या गरम पाण्यात थोडेसे निलगिरीचे तेल टाकले तर त्याचा जास्त उपयोग होतो.

५. चहा घेताना त्यात आले टाकावे, थोडी मीरपूड टाकावी आणि तुळशीची पाने टाकावीत. हा चहा खोकला आणि सर्दी थांबवण्यास उपयुक्त ठरतो. ६. सतत सर्दी होणार्‍यांनी च्यवनप्राश किंवा आवळ्याचा मुरंबा नियमाने खावा. त्यामुळे सर्दी प्रतिबंधक शक्ती वाढते. ७. गरम पाण्यामध्ये काही थेंब तूप आणि थोडे मीठ टाकून प्यावे त्यामुळे घशाची खवखव आणि सर्दी थांबते. ८. स्नानासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्यामध्येही निलगिरीचे तेल टाकल्यास सर्दी, पडसे दुरूस्त होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment