लैंगिक संबंधांतूनच जगाला हादरवणाऱ्या ‘झिका’चा प्रसार?

zika
नवी दिल्ली : लैंगिक संबंधांमुळेच अवघ्या पाश्चिमात्य जगाला हादरवणाऱ्या झिका या विषाणूचा प्रसार होतो का, याबाबत न्यूझीलंडमधील शास्त्रज्ञांनी अभ्यास सुरु केल्याची माहिती न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

याबाबत शिन्हुआ न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, झिकाप्रभावित देशातून न्यूझीलंडमधील एक व्यक्ती परतली. त्यानंतर काही दिवसातच त्या व्यक्तीच्या पत्नीला झिकाची लागण झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या महिलेने गेल्या काही महिन्यात कोणताच परदेश दौरा केलेला नाही. मात्र, परदेशात जाऊन आलेल्या पतीसोबत तिचा शारीरीक संबंध आल्याने तिला झिकाची लागण झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. हे दाम्पत्य झिकाच्या पहिल्या स्टेजला असल्याने दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.

झिकाची लागण होण्याला डॉक्टरांनी दोन कारणांची शक्यता वर्तवली असून महिलेच्या लैंगिक संबंधातून झिकाचा शरीरात प्रवेश झाला असावा आणि दुसर कारण म्हणजे, परदेशी जाऊन आलेल्या पतीच्या बॅग किंवा इतर गोष्टींसोबत आलेल्या डासांमुळे झिकाची लागण झाली असावी. मात्र, लैंगिक संबंधांमुळे साधारणत: विषाणूंचा प्रसार होत नाही, असे विज्ञान सांगते. मात्र, तरीही या दाम्पत्याला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

न्यूझीलंडमध्ये अजून झिकाची लागण झालेले रुग्ण आढळले नाहीत. फेब्रुवारीमध्ये जे आठ रुग्ण आढळले, तेही मूळचे न्यूझीलंडमधील नव्हते. ते दक्षिण आफ्रिका, टोंगा आणि अमेरिकेचे किंवा या देशांतून प्रवास करुन आले होते. त्यामुळे त्या अर्थाने न्यूझीलंड अजूनही झिकापासून सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तरीही न्यूझीलंडच्या आरोग्य खात्याने झिकाची गंभीर दखल घेतली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment