मंगळवारपासून सुवर्णरोखे योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ

gold
नवी दिल्ली – येत्या मंगळवारपासून केंद्र सरकारच्या सुवर्णरोखे योजनेचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. याआधीच्या टप्प्यातून सरकारला चांगला प्रतिसाद मिळाला असून या योजनेतून सरकारने १०५० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.

८ मार्च ते १४ मार्चपर्यंत सुवर्णरोखे योजनेअंतर्गत रोख्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर चालू महिन्यात २९ मार्च २०१६ रोजी रोखे जारी करण्यात येतील, असे अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. आणि टपाल कार्यालयात रोखे विकण्यात येतील. सरकारने नोव्हेंबरमध्ये प्रथम सुवर्णरोख्यांची विक्री केली होती. त्याद्वारे ९२५ किलो सोने जमा झाले होते.

Leave a Comment