पोस्ट विभागाची फेब्रुवारीत ५५० एटीएम कार्यरत

atmpost
पोस्ट विभागाने मार्च २०१६ अखेरी देशभरात १ हजार एटीएम बसविण्याचे जे लक्ष्य ठेवले गेले होते त्यापैकी ५५० एटीएम २४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत बसविली गेली आहेत. यावर्षी अधिक मोठ्या प्रमाणावर एटीएम बसविण्याची योजना आखली केली असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली गेली आहे.

याबरोबरच पोस्टाची २५ हजार विभागीय कार्यालये कोअर बँकींगने जोडली जाणार असून त्यामुळे खातेदार कुठल्याही शाखेत असलेल्या खात्यातून व्यवहार करू शकणार आहेत. देशभरात सध्या १ लाख ३० हजार ग्रामीण पोस्ट असून डिसेंबर २०१५ अखेरपर्यंत पोस्टाची १लाख ९३ हजार एटीएम कार्यान्वित केली गेली होती. त्यातील ३३२४९ ग्रामीण भागात आहेत तर ५१९२५ शहरी भागात आहेत.

Leave a Comment