चीनचे यान २०२१ ला मंगळावर उतरणार

mars
सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या शताब्दी वर्षाचे निमित्त साधून चीन त्यांचे यान लाल ग्रह मंगळावर उतरविण्याच्या प्रयत्नात आहे असे समजते. यापूर्वी चीनने रशियाच्या सहकार्याने २०११ साली मंगळावर यान उतरविण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. मंगळावर यान उतरविण्यात अमेरिका, रशिया, भारत व युरोपियन संघ यांनाच आजपर्यंत यश आले आहे.

चीनचे संशोधक ये पिजियान या संदर्भात बोलताना म्हणाले की आम्ही मंगळावर यान पाठविणार असून ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या १०० व्या वर्धापनदिनाच्या आसपास मंगळावर उतरेल अशा बेताने ही योजना आखली जात आहे. चांद्रमोहिमांचा चीनकडे मोठा अनुभव आहे. मंगळावर यान उतरविले गेले तर अंतराळ संशोधकांना ते बक्षीसच असेल. अर्थात मंगळावर यान उतरविणे हे वाटते तितके सोपे काम नाही याची आम्हाला जाणीव आहे.

Leave a Comment