अॅडकॉम करणार रिंगिंग बेल्स कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई

ringing-bells
नवी दिल्ली – जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रिडम २५१’ केवळ २५१ रुपयांमध्ये रिंगिंग बेल्स या भारतीय कंपनीने लाँच केला आणि सर्व मोबाईल कंपन्यांना एक धक्काच बसला. मात्र आता अशी एक बातमी आहे ज्यामुळे रिंगिंग बेल्स या कंपनीलाच धक्का बसणार आहे.

आम्ही रिंगिंग बेल्स कंपनीला प्रत्येक मोबाईल ३६०० रुपयांना विकला आहे. मात्र, आम्हाला माहित नव्हते की रिंगिंग बेल्सने हा फोन २५१ रुपयांना विकल्याचे अॅडकॉम या कंपनीने म्हटले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अॅडकॉम या कंपनीने सांगितले की या सर्व प्रकारामुळे आमच्या कंपनीचे नाव खराब होत असुन आम्ही रिंगिंग बेल्स कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. रिंगिंग बेल्सने लाँच केलेला स्मार्टफोन हा अॅडकॉमच्या आयकॉन ४ सारखाच आहे.

अॅडकॉमचे संस्थापक संजीव भाटीया यांनी सांगितले की, आमचे हँडसेट आम्ही रिंगिंग बेल्स या कंपनीला विकले मात्र, त्यांची पुन्हा विक्री २५१ रुपयांमध्ये होईल याची आम्हाला माहिती नव्हती. ‘फ्रिडम २५१’या फोनची किंमत पाहून यावर अनेक लोकांनी विविध शंका उपस्थित केल्या. मात्र, आता रिंगिंग बेल्सने ३० हजार ग्राहकांना पैसे परत केले आहेत.

Leave a Comment