‘लाझारेथ’ची कारपेक्षाही शक्तिमान एलएम ८४७ बाईक

LM-478
बॉलिवूडच्या थरारपटांसाठी विशेष बाईक्स बनविणाऱ्या ‘लाझारेथ’ या फ्रेंच कंपनीने तब्बल ४७० अश्वशक्तीचे ४.७ लीटर ‘मासेराती व्ही- ८’ हे इंजिन असलेली शक्तिमान बाईक बनविली आहे.

या बाईकच्या जबरदस्त इंजिनाला ७ हजार आरपीएम, ६२० एनएम टॉर्क क्षमता प्रदान करण्यात आली असून ही क्षमता ‘डॉज टॉमहॉक’ व्ही १० च्या नजीक पोहोचणारी आहे. मात्र या बाईकमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या अन्य सुविधा ‘डॉज टॉमहॉक’च्यापेक्षाही अधिक आहेत.

या अनोख्या बाईकला चार चाके असून तिच्या वेगाला नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित गिअर्स बसविण्यात आले असून पुढील चाकांना निस्सीन ८ पिस्टन कॅलिपरसह ४२० मिमी ड्युएल डिस्क ब्रेक्स बसविण्यात आले आहेत. मागच्या चाकांना ड्युएल २५५ मिमी डिस्क ब्रेम्बो ४ पिस्टनसह बसविण्यात आले आहे.

Leave a Comment