विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना ‘नरेंद्र मोदी अॅप‘ची माहिती द्या

modi-app
नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सर्व शाळांना आपले अनुभव पंतप्रधानांसोबत शेअर करता यावेत यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना ‘नरेंद्र मोदी अॅप‘ची माहिती द्यावी असे निर्देश दिले आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचे परिक्षेतील अनुभव शेअर करण्याबाबत मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे सांगितले होते. त्यासाठी अॅपचा उपयोग करावा असेही सांगितले होते. या ऍपचा प्रसार करण्यासाठी आता सीबीएसईची मदत घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी आपले परिक्षेबद्दलचे अनुभव या अॅपद्वारे शेअर करावेत, अशा सूचना सीबीएसईने सर्व शाळांना दिल्या आहेत. या बाबत सीबीएसईने प्रसिद्ध केलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, सर्व शाळांतील प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करून परिक्षेच्या काळातील ताण कशाप्रकारे दूर करता याचे अनुभव शेअर करण्यास सांगावे.

Leave a Comment