तब्बल ४७ व्यांदा दहावीची परीक्षा देणार ७७ वर्षांचे आजोबा

shivcharan-yadav
जयपूर – कोणत्याही परीक्षेत किती वेळा एखादी व्यक्ती नापास होऊ शकेल ? एक, दोन वा जास्तीत जास्त १० वेळा! पण गेल्या ४६ वर्षांपासून १०वीची परीक्षा राजस्थानमधील शिवचरण यादव हे ७७ वर्षीय इसम देत असून प्रत्येक वेळेस एखादा विषय राहिल्याने ते नापास झाले आहेत. येथील बोर्डाची परीक्षा यावर्षी १० मार्चपासून सुरू होणार असून ते ४७ व्यांदा परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे इतक्या वेळा अपयश मिळूनही ते खचले नसून कोणत्याही परिस्थितीत आपण या परीक्षेत उत्तीर्ण होऊच, असा निर्धार करून ते यंदाही रात्रभर जागून अभ्यास करण्यात मग्न आहेत.

वाड-वडिलांच्या काळापासून असलेल्या घरात राजस्थनाच्या अलवर जिल्ह्यातील खोहारी गावात राहणारे ७७ वर्षांचे शिवचरण यादव हे एकटेच राहतात. राज्यातील दहावीची परीक्षा येत्या १० मार्चपासून सुरू होणार असून यावर्षी तरी आपण नक्की यशस्वी होऊ असा विश्वास त्यांना आहे आणि जोपर्यंत १० वी उत्तीर्ण होणार नाही, तोपर्यंत आपण लग्न करणार नाही असा ‘पण’ त्यांनी केला आहे.

Leave a Comment