शिवमंदिर बांधणार तैवानी कंपनी

mahadev
जयपूर- जयपूर मेट्रोच्या मार्गात येत असल्याने पाडले गेलेले परकोटा भागातील रोजगारेश्वर महादेव मंदिर पुन्हा पूर्वीच्याच स्वरूपात उभारले जाणार असून काँटीनेंटल इंजिनिअरिंग कार्पोरेशन या तैवानी बांधकाम कंपनीकडे त्याचे कंत्राट सोपविले गेले आह.

जयपूर मेट्रो उभारताना रस्त्यात येत असलेले हे १५० वर्षांचे प्राचीन मंदिर पाडले गेले होते. त्यावरून जयपूर प्रशासन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमनेसामने ठाकले होते. मंदिर पाडल्याविरोधात चक्का जाम आंदोलनही केले गेले होते. मंदिर बचाव समिनीने महाशिवरात्री निमित्ताने येथे मोठा सोहळा आयोजित करणार असल्याची घोषणाही केली होती. जनमानसातील असंतोष लक्षात घेऊन जयपूर प्रशासनाने याच जागी मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर येथे शिलान्यास केला जाईल असेही समजते. या मंदिराचे जुने दगड वापरून व मूळ स्वरूपातच ते पुन्हा उभारले जाणार आहे.

Leave a Comment