रिलायन्सच्या मालमत्तेची सुरक्षा निवृत्त जवानांच्या हाती

reliance
मुंबई- रिलायन्स उद्योगसमुहाने त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी १६ हजार निवृत्त लष्करी जवान व अधिकारी नियुक्त केले असून त्यात कमांडोंचाही समावेश आहे. ५७ अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या या समुहाच्या उर्जा व आर्थिक संपत्तीची सुरक्षा या जवानांच्या हाती सोपविली गेली आहे.

यासाठी नेमण्यात आलेले जवान, अधिकारी व कमांडो कारगिल युद्धात कामगिरी बजावलेले आहेत तसेच मुंबई दहशतवादी हल्ला व अहमदाबाद अक्षरधाम दहशतवादी हल्ला येथील कारवाईतही समावेश असलेले आहेत. ग्लोबल कार्पोरेट सिक्युरिटी नावाने ही भरती करण्यात आली आहे. त्यात इन्र्फोमेशन टेक्नॉलॉजीतील लष्करी तज्ञांचाही समावेश आहे. या लोकांना तज्ञांकडून माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सरकारकडून झेड प्लस सुरक्षा यापूर्वीच दिली गेली आहे. तसेच जामनगर येथील जगातील सर्वात मोठ्या रिलायन्सच्या रिफायनरीसाठी सीआयएसएफ कडे सुरक्षेची जबाबदारी सोपविली गेली आहे. या रिफायनरीला उडवून देण्याची धमकी सीमेपलिकडून मिळाली होती.

Leave a Comment