या देशात आता महिलांना ‘त्या’ दिवसांची रजा

period
लंडन : नोकरी करणा-या महिलांना ‘प्रेग्नन्सी लिव्ह’ मिळते हे सर्वांनाच माहिती आहे, पण आता प्रेग्नन्सी लिव्हसोबतच महिलांना ‘पिरीएड लिव्ह’सुद्धा मिळण्याची प्रथा सुरू झाली आहे. खासकरून कार्पोरेट सेक्टरमध्ये ही प्रथा अलिकडे उदयास आली असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

भारतात अजूनतरी महिलांसाठीची ही ‘पिरीएड लिव्ह’ सुरू झालेली नाही. पण ब्रिटनमधील ‘कोएक्झिस्ट’ कंपनीने त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी ही ‘पिरीएड लिव्ह’ जाहीर केली आहे. अलिकडे हा नवा नियम अनेक आयटी कंपन्यांमध्ये बघायला मिळतो. इंग्लंडच्या दक्षिण पश्चिम भागात या कंपनी असून देशात हे पहिल्यांदा घडत आहे.

महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणात ‘कोएक्झिस्ट’ या कंपनीमध्ये आहेत. त्यांना मासिक पाळीच्या दिवसांत घरूनच काम करण्यासाठी लवचिक वेळेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे त्यांना वेळोवेळी ‘सिक लिव्ह’च्या नावाखाली सुट्ट्या घ्याव्या लागणार नाहीत, असे कंपनीचे म्हणणे आहे. नाईकी या जगप्रसिद्ध कंपनीने २००७ मध्ये ‘मेन्सट्रल लिव्ह’ पहिल्यांदा जाहीर केली होती. तसेच चीन, जपान, साऊथ कोरिया आणि तैवान यांसारख्या देशांतही अशा प्रकारच्या सुट्ट्या महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जातात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही