पिनिनफेरिनाच्या एच टू स्पीडने खेचल्या प्रेक्षकांच्या नजरा

speed
जिनिव्हा येथे झालेल्या कार शो मध्ये पिनिनफेरिनाच्या एच टू स्पीडने प्रेक्षकांच्या नजरा खेचण्यात यश मिळविले असून या कारवरून नजर हटविणे अवघड जात होते अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनीही नोंदविली आहे. ही कार जिनिव्हा शोचे खास आकर्षण ठरली कारण ती हायड्रोजनवर चालणारी पहिलीच रेसिंग कार आहे.

बाजारात हायड्रोजनवर चालणार्‍या कार आजही रस्त्यावर धावत आहेत. मात्र त्यात रेसिंग कारचा समावेश नव्हता. म्हणजे हायड्रोजन कार अजून ट्रॅकवर धावलेली नाही. त्यामुळे एचटू स्पीड वेगळी ठरली. या कारची चासी कार्बनपासून बनविली गेली आहे तसेच ब्रेक्स सिस्टीममध्येही कार्बनचा वापर गेला गेला आहे. या कारला पर्मनंट मॅग्नेटवाल्या दोन इलेक्ट्रीक सिक्रॉमस मोटर्सपासून ताकद दिली जाते. त्याशिवाय तिला १ लाईटवेट एचटू फयूएल सेल व ब्रेकींग एनर्जी रिजनरेशन सिस्टीमही दिली गेली आहे. या कारला क्लच नाही.

रिफयूएलिंग साठी या कारला तीन मिनिटे पुरतात. या कारमुळे पोल्यूशन होत नाही.० ते १०० चा स्पीड ती ३.४ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३०० किमी. ही कार किती किमतीला विकली जाणार याचा खुलासा मात्र केला गेलेला नाही.

Leave a Comment