नव्या रंगात रॉयल एन्फिल्डची क्लासिक ५०० - Majha Paper

नव्या रंगात रॉयल एन्फिल्डची क्लासिक ५००

royal-enfield
नवी दिल्ली : निळया आकर्षक रंगात ‘क्लासिक ५००’ ही नवीन बुलेट निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘रॉयल एनफिल्ड’ने लाँच केली आहे. या बुलेटची मुंबईतील एक्सशोरूममध्ये किंमत १ लाख ४६ हजार ५५८, तर दिल्ली एक्सशोरूमध्ये १ लाख ९० हजार रूपये आहे.स्क्वेड्रन ब्ल्यू रंगात लाँच केलेल्या क्लासिक ५०० मध्ये ४९९ सीसीचे इंजिन असून ते २७.२० बीएचपी पॉवर आणि ४१.३० एनएम टॉर्क जनरेट करते. ही बुलेट प्रती लिटर ३२ किलोमीटरचे मायलेज व १३०चा टॉप स्पीड देते, असा दावा कंपनीने केला आहे. या बुलेटचे वजन १९० किलो असून १३ लिटर फ्यूअल टँक क्षमता, डिस्क ब्रेक, ५ गिअर, इलेक्ट्रीक स्टार्ट, स्पोक व्हिल्स ही या बुलेटची वैशिष्टय़े आहेत.

Leave a Comment