अमेरिकेतील निम्मी मुले दारिद्रयात काढताहेत दिवस

children
अमेरिकेसारख्या विकसित व श्रीमंत संपन्न देशात गरीबी नावाला तरी असेल का अशी शंका घेण्याचे आता कांहीच कारण नाही कारण कोलंबिया विद्यापीठाच्या नॅशनल सेंटर फॉर चिल्ड्रन इन पॉवर्टी ने सादर केलेल्या नव्या अहवालानुसार अमेरिकेतील निम्मी मुले दारिद्रय रेषेजवळ जीवन जगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा अहवाल तयार करताना अमेरिकेतील आर्थिक अस्थिरता व गरीबीच्या परिस्थितीचा जो उल्लेख केला गेला आहे, त्यानुसार ३ कोटी १० लाख मुले ही दारिद्रयात आयुष्य कंठत आहेत. अहवाल तयार करण्यात सहभाग असलेल्या रिनी विल्सन यांच्या म्हणण्यानुसार हा डेटा गोळा करताना २००८ पासून २०१४ पर्यंत अशा दारिद्रयात जगणार्‍या मुलांच्या संख्येत १८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे तर कमी उत्पन्न गटातील घरात मुलांच्या संख्येत १० टक्के वाढ झाली आहे याचाच अर्थ अमेरिकेतील दर दहा मुलांत चार मुले दारिद्रयरेषेजवळ जीवन जगत आहेत.