नोकरीसाठी फ्लिपकार्टवर स्वत:लाच काढले विकायला

niraj-mittal
नवी दिल्ली : फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर नोकरी मिळविण्यासाठी उतावीळ झालेल्या एका पठ्ठ्याने स्वत:लाच विकायला काढले आहे. या विद्यार्थ्याचे नाव निरज मित्तल असेअसून, तो आयआयटी खरगपूरमधून पास झाला आहे. अनोख्या पद्धतीने नोकरी शोधावी अशी कल्पना मनात आल्याने त्याने ही शक्कल लढवली आहे.

निरज नित्तल याने फ्लिपकार्टवर दिलेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही अष्टपैलू असता आणि देशातील सर्वांत हुशार व्यक्तींसोबत स्पर्धा करत असता त्यावेळी योग्य नोकरी मिळणे हे किती अवघड असते हे तुम्हाला माहिती असते. गर्दीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काहीतरी करावे लागते. फ्लिपकार्टवर हे माझे प्रोफाईल आहे. आतापर्यंत मला एकही कॉल आलेला नसून मला आशा आहे की मी कोणाच्या तरी ओठांवर हसू फुलवू शकलो.

दरम्यान, निरज नित्तलच्या या जाहीरातीची समाज माध्यमे (सोशल मीडिया) आणि प्रसारमाध्यमांतून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी त्याच्या या अनोख्या जाहिरातीचे कौतूक केले आहे. तर अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. ऑनलाईन सेवा देणारी संकेतस्थळे सुरू झाल्यापासून अशा प्रकारच्या अनेक धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत. मध्यंतरी एका सुनेनेही आपल्या सासूला ऑनलाईन विकण्यासाठी एका संकेतस्थळावरू ऑनलाईन जाहीरात दिली होती. सुनेच्या या बेताल जाहीरातीचीही तेव्हा जोरदार चर्चा झाली होती.

Leave a Comment