अलेक्झांड्रा अँडर्सन आहे जगातील सर्वात अब्जाधीश तरुणी

anderson
न्यूयॉर्क – एखाद्या मॉडेललाही मागे टाकेल अशी नॉर्वेतील सुंदरी अलेक्झांड्रा अँडर्सन ही केवळ १९ वर्षाची मुलगी जगातील सर्वात कमी वयाची अब्जाधीश आहे. तिची सर्वात तरुण अब्जाधीश अशी नोंद फोर्ब्जच्या यादीत झाली आहे. १.२१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ८१२३ कोटी रुपये तिच्याकडे आहेत.

जर्मनीमध्ये राहणारी अलेक्झांड्रा अँडर्सन एक व्यावसायिक घोडेस्वारही आहे. युरोपमधील जूनियर हॉर्सराडर्स चँपियनशिपची ती अनेकवेळा विजेती ठरली आहे. तिची कंपनी आहे. त्यासाठी ती स्वतः जास्त काम करत नाही. त्यामुळे आपला एवढ्या मोठ्या मालमत्तेवर हक्क आहे असे तिला मात्र वाटत नाही. अलेक्झांड्रा अँडर्सनचे वडिल जॉन अँडर्सन यांचा तंबाखूचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीचे ८० टक्के शेअर त्यांच्या दोन मुलींच्या नावे २००७ साली केले होते. अलेक्झांड्रा अँडर्सन ही तिची बहिण कॅथरीनाच्या बरोबर फोर्ब्जच्या यादीत १४५७ व्या क्रमांकावर आहे. मात्र वयाच्या १९ व्या वर्षी अब्जाधीश म्हणून ती जगातील सर्वात तरुण ठरली आहे.

Leave a Comment