स्पेसशीप तंत्रज्ञानावरच्या अरश एएफ १० ची ग्राहकांना भुरळ

arash
जिनेव्हा येथे नुकत्याच सादर झालेल्या मोटर शो २०१६ मध्ये अरशच्या एएफ १० सुपरकारने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली आहे. या कारने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून ही कार बाजारात साडेतीन कोटी ते १२ कोटी रूपयांत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या कारसाठी स्पेसशीप तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. विमानाच्या पंखांप्रमाणे वरच्या टियरवर ड्राॅप केबिन बनविली गेली आहे. कारला रियर विंग जोडले गेले आहे व पुढच्या बाजूला मुव्हींग विंग लावला गेला आहे. हे तंत्रज्ञान स्पेसशीपसाठी वापरले जाते. या कारला चार इलेक्ट्रीक मोटर्स व १ पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. ६.२ लिटरचे सुपरचार्ज्ड व्ही ८ इंजिन तिला दिले गेले असून या पाच इंजिनांसाठी पाच गिअरबॉक्स दिले गेले आहेत.

० ते १०० किमीचा स्पीड घेण्यासाठी या कारला तीन सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतो तर २०० किमीचा स्पीड ती ८ सेकंदात घेते. या कारचा टॉप स्पीड आहे ताशी ३२५ किमी. कारची चासी कार्बन पासून बनविली गेली आहे व तिला ७० लिटरची इंधन टाकी दिली गेली आहे.

Leave a Comment