सलग चार दिवस या महिन्यात बंद राहणार बँका

bank
मुंबई – बँकांना चालू महिन्याच्या शेवटी २४ ते २७ मार्च या चार दिवसांमध्ये सलग सुटी राहणार असल्यामुळे या काळात जर आपली बँकांची काही कामे असतील तर ती त्याच्यापूर्वीच उरकून घेणे आवश्यक आहे. याबाबत बँक प्रशासनाकडून एसएमएस पाठवून अलर्ट करण्यात येणार आहे. २४ मार्चला गुरुवारी धूलिवंदन असल्याने बँकांना सुटी आहे. त्यानंतर शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने बँका बंद राहतील. बँकांना दुस-या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी लागू झाली आहे. त्यानुसार २६ तारखेला बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर २७ तारखेला रविवार आहे. सलग चार दिवस सुट्टय़ा असल्याने बँक कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी ग्राहकांसाठी मात्र मनस्ताप वाढण्याची शक्यता जास्त आहे. या काळात उत्सव असल्याने एटीएममधील रोख रक्कमही संपू शकते. त्यामुळे ग्राहकांनी सुट्टय़ांपूर्वी आवश्यक ती रक्कम एटीएम किंवा आपल्या शाखेत येऊन काढून घेत आर्थिक पूर्वनियोजन करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

Leave a Comment