मधुमेहींचा आदर्श आहार

diabetes
एखाद्या व्यक्तीला मधुमेहाने गाठले की त्याचे निरस आयुष्य सुरू झाले असे मानले जाते. आता मधुमेह झाला आहे. गोड खायचे नाही; बिनसाखरेचा चहा प्यायचा; बेचव जेवण करायचे आणि अशाप्रकारे आपल्या आयुष्याचा एक वनवासच सुरू झाला असे मधुमेहींना वाटते. परंतु तसे समजण्याचे काही कारण नाही. मुंबईतील आहारतज्ञ सुनीता पठानिया यांनी मधुमेह झाला असला तरी काही पथ्ये पाळून चवदार जेवण करता येऊ शकते. आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो असा दिलासा दिला आहे. मात्र आपण काय खात आहोत आणि किती खात आहोत याचे भान ठेवले पाहिजे एवढेच त्यांचे म्हणणे आहे.

त्यांनी दिलेल्या सूचना अशा आहेत.

१. अन्न सेवन करताना चरबी कमी असणारे आणि तंतूमय पदार्थ जास्त असणारे पदार्थ खा.
२. आर्टिफिशियल स्विटनर वापरून तयार केलेली थंड पेये वापरायला हरकत नाही.
३. फळांचे रस पिण्याची आवड असेल तर रसही प्यायला हरकत नाही. मात्र अर्धाकप ज्यूस प्या आणि शक्यतो तो ज्यूस जेवणाबरोबर घ्या. त्यातल्या त्यात संत्रे, द्राक्ष, सफरचंद या फळांचे रस घ्या.
४. ज्यामध्ये साखरचे प्रमाण जास्त असते असे केक आणि कॅन्डीज खाणे टाळा.
५. दिवसातून तीन वेळा जेवण करा आणि जेवणाची वेळ टळू देऊ नका. दारू पिऊ नका. महागाचे कृत्रिम अन्नपदार्थ टाळा. त्यांना वगळता बाकीचे अन्नपदार्थ खायला हरकत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment