क्रूझवर साजरे करता येतील लग्नसमारंभ

cruise
दिल्ली- विवाहासारखी घटना संस्मरणीय करण्यासाठी अनेक जण अनेक हिकमती लढवितात. लोकांच्या या इच्छा लक्षात घेऊन केंद्र सरकारनेही त्यांना प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. जहाजबांधणी मंत्रालय व रस्ते विकास मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी देशात लवकरच क्रूझवर लग्नसमारंभ साजरे करण्याची योजना सरकार हाती घेत असल्याचे सांगितले. ते म्हणाले या कार्यक्रमांसाठी कांही खासगी कंपन्यांनी रस दाखविला असून लग्नकार्यालयांपेक्षाही उत्तम सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जातील.

मिळालेल्या माहितीनुसार या लग्नसोहळ्यात ४ ते ५ हजार वर्‍हाडी उपस्थित राहू शकतील. त्यांच्यासाठी पुरेशा खोल्या, शिवाय कॅमेरे, खेळाचे मैदान, स्विमिंगपूल, स्पा, सलून आणि उत्कृष्ठ भोजनव्यवस्था अशा सुविधा मिळतील. मुंबई, गोवा येथल्या समुद्रात तसेच अन्य समुद्र किनार्‍यावरील शहरातून ही सेवा देता येईल. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून परवानगी घेऊन समुद्री विमान सेवा दिली जाणार आहे. एका खासगी कंपनीने अशी २५ विमाने उड्डाणासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे मात्र उड्डाण मंत्रालयाकडून परवानगी मिळेपर्यंत ही उड्डाणे होणार नाहीत.

Leave a Comment