अवघ्या ३ महिन्यांच्या चिमुरडीला २० हार्ट अटॅक

baby
सोलापूर : सध्या अनेकांचे लक्ष सोलापुरातील चार महिन्यांची ‘मिरॅकल बेबी’ वेधून घेत असून दोन महिन्यांच्या कालावधीत या चिमुरडीला हृदयविकाराचे तब्बल २० झटके आल्याची माहिती आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अवघ्या चार महिन्यांच्या या मुलीचे नाव आदिती गिलबिले असे असून धीरोदात्तपणे मृत्यूचा सामना करत असल्याचे म्हटल्यास वावग ठरु नये. अत्यंत दुर्मीळ अशा हृदयरोगाने आदितीला ग्रासले. वैद्यकीय परिभाषेतील अॅनॉमलस लेफ्ट कोरोनरी आर्टरी फ्रॉम पल्मनरी आर्टरी (ALCAPA) असे नाव असलेला विकार तिला झाला. हा रोग तीन लाखात एखाद्या बाळाला होतो, अशी माहिती आहे.

आदितीत दोन महिन्यांची असताना संबंधित रोगाची लक्षण दिसू लागली. आदिती अत्यंत चिडचिडी झाली, तिचे श्वसन आणि स्तनपान अनियमित होऊ लागले, तिला घाम फुटायचा, इतकेच काय तर तिच्या वजनावरही परिणाम झाला, असे आदितीची आई प्रिती गिलबिले सांगतात. एके दिवशी ती सलग तीन तास रडत राहिली, तेव्हा आम्ही तिला डॉक्टरकडे नेले. हृदयाशी निगडीत काहीतरी आजार असल्याचे सांगून बार्शीच्या डॉक्टरांनी पुण्याच्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. पुण्यात आदितीला संबंधित हृदयविकाराचे निदान करण्यात आल्यानंतर मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात २१ फेब्रुवारी रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली.

पुढील आठ ते नऊ महिन्यात आदितीच्या प्रकृतीत सुधार पडेल, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. शुद्ध रक्त हृदयापासून लांब जात असल्यामुळे अनेकदा हृदयविकाराचे धक्के बसले. यामुळे हृदयातील स्नायूंना दुखापत झाली आहे. तिच्या प्रकृतीत सुधारणा असून दोन ते तीन दिवसात डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment