ध्वनीच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने धावणार नासाचे प्रवासी विमान !

nasa
वॉशिंग्टन – स्वनातीत प्रवासी विमान (सुपरसोनिक पॅसेंजर जेट) बनविण्याची घोषणा नासाने केली असून ध्वनीच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने हे विमान उड्डाण भरण्याचा अनुभव प्रवाशांना करविणार आहे. २०२० सालापर्यंत हे प्रवासी विमान समोर येण्याची शक्यता आहे. लॉकहिड मार्टिन या कंपनीला यासाठी नासाने २० दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट दिले आहे. या विमानाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी या कंपनीकडे असेल. नासाचे प्रशासक चार्ल्स बोल्ड यांनी याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

हे स्वनातीत विमान ध्वनीच्या गतीपेक्षा अधिक वेगाने उड्डाण भरू शकणार आहे. नासानुसार आतापर्यंत जेटमध्ये असणारी इंजिने मोठा आवाज करतात. याशिवाय त्यांच्यामुळे पर्यावरणाला देखील नुकसान पोहोचते. परंतु या नव्या विमानात लावण्यातत आलेले इंजिन फक्त ध्वनी प्रदूषण कमी करण्यास साहाय्यक ठरेल तसेच पर्यावरणाला देखील कमी नुकसान पोहोचवेल. यात विशेष इंधनाचा वापर केला जाणार आहे.

नासानुसार ते या विमानाला प्रवाशांची सुविधा आणि त्यांची सुरक्षा पाहता डिझाइन तयार करवून घेत आहे. हे एक असे जेट असेल जे प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी लवकर पोहोचविण्यास उपयुक्त असेल. नासानुसार यासाठी काही वेळ लागेल आणि २०२० मध्ये पहिल्यांदा उड्डाण भरेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment