ही पथ्ये पाळा…

diet
दिवसाची सुरूवात कोणत्या खाण्याने करावी असा प्रश्‍न नेहमी विचारला जातो. काही लोक चहाने दिवसाची सुरूवात करतात तर काही लोक आता ज्यूस पिऊन दिवसाची सुरूवात करायला लागले आहेत. परंतु ज्यूस किंवा कोणतेही दुग्धजन्य पदार्थ हे दिवसाच्या सुरूवातीला घेऊ नयेत, असा सल्ला आहारतज्ञ देत आहेत. कारण या पदार्थांचे सेवन सकाळी सकाळीच केले तर कफ वाढण्याची शक्यता असते. काही लोकांना तर सकाळी आईस्क्रिम खाण्याची सवय असते आणि काही लोकांना कोल्ड कॉफी घेण्याची आवड असते. असे खाद्य पदार्थ नीट साठवलेले नसतील तर त्यांचा फायदा होण्याऐवजी उपद्रव होण्याची शक्यता असते. अशा खाद्य पदार्थांच्या सेवनाने काही तासातच नाक चोंदते आणि काही वेळा जुलाबही होण्याची शक्यता असते.

आरोग्याला ताक पिणे चांगलेच असते. परंतु ताक दुपारीच पिले पाहिजे. दुपारी ताक पिणे जितके फायदेशीर आहे तितकेच रात्री ताक पिणे नुकसानकारक आहे. दही, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन रात्री केल्यास सकाळी हमखास घसा खवखवायला लागतो. ताक प्राशन करून दिवस सुरू करणेही तितकेच घातक असते. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे पोट जड पडते. भाज्या खावेत हे जेवढे खरे आहे परंतु कोणत्या भाज्या कधी खाव्यात याची निवड करता आली पाहिजे. सध्या बाजारात बारा महिने सगळ्याच भाज्या मिळायला लागल्या आहेत. मिळतात म्हणून सगळ्याच भाज्या खरेदी करून खात बसणे वाईट असते. हंगामात नैसर्गिकरित्या येणार्‍या भाज्याच खाल्ल्या पाहिजेत. बहुतेक भाज्यांचा हंगाम हिवाळ्यात असतो. त्यामुळे हिवाळ्यात हंगामी भाज्या भरपूर खाल्ल्या पाहिजेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment