मॉर्गनची तीनचाकी इव्ही ३ इलेक्टीक कार वर्षअखेरी बाजारात

morgan
विंटेज कार लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटीश मॉर्गन मोटरने त्यांची जिनिव्हा कार शो २०१६ मध्ये सादर केलेली तीन चाकी मॉर्गन इव्ही ३ ही इलेक्ट्रीक कार या वर्षअखेरी बाजारात विक्रीसाठी येणार असल्याचे जाहीर केले आहे. इलेक्ट्रीक कारसाठी वाढत चाललेली मागणी आणि गरज लक्षात घेऊन ही कार बाजारात आणली जात आहे.

अतिशय आकर्षक डिझाईनच्या या कारची दोन चाके पुढच्या भागात तर १ चाक मागे आहे. ९ सेकंदात ही कार ० ते १०० किमीचा वेग घेते.तिला लिथियम बॅटरी दिली गेली आहे शिवाय मागचे चाक ४६ केडब्ल्यूके पॉवरच्या लिक्विड कूल मोटरशी जोडले गेलेले आहे. कारचे बॉनेट कार्बन पासून बनविले गेले आहे. १९३० च्या दशकातल्या एरोइंजिन रेसकार, क्लासिक मोटरसायकल्स व १९५० च्या दशकातल्या गाड्या यातून या कारच्या डिझाईनसाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले जात आहे. कारची किंमत अजून जाहीर केली गेलेली नाही मात्र वर्षअखेर या कार्सचे उत्पादन सुरू होत आहे.

Leave a Comment