फोर्ब्ज यादीत बिल गेटस अव्वल- ८४ भारतीयांचाही समावेश

forbs
फोर्ब्जने नुकत्याच जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत मायक्रोसॉफटचे बिल गेटस यांनी ७५ अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह पुन्हा अव्वल स्थान मिळविले असून सलग तिसर्‍या वर्षी ते १ नंबरवर राहिले आहेत. अर्थात गेल्या २२ वर्षात १७ वेळा गेटस यांनी सर्वाधिक श्रीमंत असण्याचा मान मिळविला आहे. रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ते या यादीत ३७ व्या स्थानी आहेत मात्र गतवर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत ३ अब्ज डॉलर्सची घट नोंदविली गेली आहे.

यंदाच्या यादीत अब्जाधीशांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत १६ ने कमी आहे. यंदा या यादीत १८१० व्यक्तींचा समावेश आहे. स्पेनचा अब्जाधीश व झारा कंपनीचा संस्थापक अमानसिअयो ओर्तेगा याने दोन नंबरवर नाव कोरले आहे तर वॉरेन बफेट, मेक्सिकोचा कार्लोस स्लीम, अॅमेझॉनचा सीईओ जेक बेजस अनुक्रमे तीन चार व पाच नंबरवर आहेत.

या यादीतील भारतीयांत दिलीप सांघवी, अझीज प्रेमजी, शिव नाडर, मित्तल, गौतम अडाणी, जंदाल, राहुल बजाज, नारायणमूर्ती, आनंद महिद्रा यांचा समावेश आहे.

Leave a Comment