पद्मश्रीने सन्मानित होणार झारखंडचा ‘वॉटरमॅन’

waterman
रांची – केंद्र सरकार पद्मश्री पुरस्काराने झारखंडच्या बीडो ब्लॉकमध्ये राहणारे सिमोन ओरान यांना सन्मानित करणार आहे. फक्त आपल्या गावालाच दुष्काळातून वाचविले असे नाही तर आसपासच्या अनेक गावांना उपासमारी आणि दुष्टचक्रापासून सीमोन यांनी बचावले आहे.

१९६० पासून सुरू होते सीमोन यांची गोष्ट, ते जेव्हा चौथीत शिकत होते. त्यावेळी भयंकर दुष्काळ पडला, लोक अन्नावाचून तडफडत होते. तसेच लोक त्या भागातून पलायन करत होते. स्थिती जाणून घेत सीमोन यांनी शिक्षण सोडले आणि पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

सीमोन पावसावेळी अशाठिकाणी धावत जेव्हा पाण्याचा प्रवाह असायचा. एकेदिवशी पावसादरम्यान त्यांनी पाण्याचा तेज प्रवाह उंचीवरून कोसळताना आणि खाली अनेक प्रवाहांमध्ये वाहताना पाहिला. तेथे एक बंधारा बनवून पाण्याचा साठा करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. अनेक दिवसांपर्यंत पाण्याचा प्रवाह आणि त्याची दिशा समजून घेत २८ वर्षांच्या सीमोन ओरान यांनी आपल्या मित्रांसोबत १९६१मध्ये जयघटमध्ये धरण बनविण्याचे काम सुरू केले. परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत कारण मूसळधार पावसामुळे बंधारा पाण्याचा वेग सहन करू शकला नाही आणि तुटून पडला. परंतु या प्रयत्नानंतर सीमोन यांनी आणखी अधिक मजबूत बंधारा बनविण्याचा निर्णय घेतला. सीमोन यांनी यासाठी सरकारची मदत मागितली आणि राज्याच्या जल विभागाच्या मदतीने तेथे एक मजबूत बंधारा निर्माण करण्यात आला.

त्यांनी यानंतर कोणाच्याही मदतीविना देशबली, झारिया, आंबा, जांभुळ यांची जवळपास ३० हजार झाडे संपूर्ण भागात लावली. यावेळी सरकार आणि गावक-यांकडून सीमोन यांना कोणतीही विशेष मदत मिळाली नाही. यानंतर सीमोन यांनी लोकांकडून बंधारा बनविण्यासाठी त्यांची जमीन मागितली, परंतु लोकांनी फारसा उत्साह दाखविला नाही, तेव्हा सीमोन यांनी स्वतःच्या जमिनीत बंधारा बांधला. सीमोन यांनी अनेक गावांमध्ये तलाव निर्माण केले आणि त्यांना बंधाऱयाशी जोडले. सीमोन यांचा हा भगीरथ प्रयत्न अखेर यशस्वी ठरत पाणी जमा होण्यास सुरुवात झाली.

आता सीमोन ओरान ८३ वर्षांचे झाले आहेत आणि त्यांना या भगीरथ प्रयत्नांसाठी सरकारने पद्मश्री पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. सीमोन यांचे त्यांच्या गावात आणि नजीकच्या गावांमध्ये आदरयुक्त स्थान आहे. लोक त्यांना सन्मानाने इंजिनियर म्हणतात.

Leave a Comment