येथे फक्त महिलाच करू शकतात पूजा

mandir
नगरजवळील शनीशिंगणापूर येथे शनीदेवाची पूजा करण्यास महिलांना असलेल्या प्रतिबंधावरून वातावरण तापले असतानाच देशात अशी अनेक मंदिरे आहेत जेथे फक्त महिलाच पूजा करू शकतात व पुरूषांना तेथे पूजा करण्यास बंदी आहे. याच मालिकेतले आणखी एक मंदिर मध्यप्रदेशातील सिलमपुरा येथे उभारले जात असून या मंदिरासाठी ५ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार स्वामी नारायण संप्रदायातील योगी मंदिरात फक्त महिलाच पूजा अर्चा करू शकतात आणि गेल्या ३०० वर्षांपेक्षा अधिक काळ ही प्रथा सुरू आहे. या मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती असते. देशात या प्रकारची १ हजारांपेक्षा जास्त मंदिरे असून परदेशातही अशी २०० मंदिरे आहेत. मध्यप्रदेशातील बुर्हारणपूर येथे पहिलेच असे मंदिर उभारले जात आहे. गेली ७० वर्षे हे मंदिर एका घरातच होते व राधाबाई नावाची भाविक महिला तेथे आजपर्यंत पूजा करत आहेत. या महिलेने मंदिरासह अडीच एकर जमीन दान केली असून तेथेच आता भव्य मंदिर उभारले जाणार आहे.

Leave a Comment