पोर्न प्रमाणेच रोबो सेक्सही होणार सर्वसामान्य गोष्ट

robot
ईयान पिअर्सन या जागतिक कीतीच्या भविष्यवेत्याने केलेल्या भविष्यवाणीनुसार १० वर्षांपेक्षाही कमी काळात रोबो बरोबर सेक्स करणे ही सामान्य गोष्ट बनेल. वेबसाईट डॅमवर दिलेल्या माहितीनुसार २०२५ सालापर्यंत हुबेहुब माणसासारखे रोबो बनविण्याचे प्रमाण वाढलेले असेल व त्याचबरोबर रोबोबरोबर सेक्स करणार्‍यांची संख्या वाढेल इतकेच नव्हे तर ही सर्वसामान्य बाब बनेल. म्हणजे त्याविषयी कोणी वेगळी चर्चाही करणार नाही. ब्रिटनच्या सेक्स टॉय विक्री करणार्‍या बोंडारा या कंपनीनेही ईयानच्या भविष्यवाणीचे समर्थन केले आहे.

कांही काळापूर्वी पोर्न फिल्म पाहणे म्हणजे विशेष कांही करणे मानले जात असे मात्र आता पोर्नही भूतकाळात जमा होण्याच्या मार्गावर आहे. २०३० सालापर्यंत मानव पोर्नपेक्षा व्हर्च्युअल सेक्सला प्राधान्य देईल तर २०२५ पूर्वी श्रीमंत व्यक्ती सेक्स रोबो सांभाळतील. तसेच रोबो हा माणसाच्या दिनचर्येचाच एक भाग बनेल कारण त्या काळापर्यत रोबो आणि माणसात फरक राहणार नाही असेही ईयानचे म्हणणे आहे.

Leave a Comment