एलजीचा जी फाईव्ह स्मार्टफोन भारतात येणार

lgg5
पुढच्या तिमाहीत एलजीचा जी फाईव्ह स्मार्टफोन भारतात सादर केला जात असल्याचे एलजी भारतातील प्रमुख अमित गुजराल यांनी सांगितले. रिन्यूएबल बॅटरी व मॉड्युलर डिझाईनमुळे हा फोन अगोदरच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. यात एख्स्पेंडेबल माँडयूल सह अनेक फिचर्स दिली गेली आहेत. हे मॉडयूल कॅमेरा व फोन बॅटरी वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.

कोरियातील सर्वेक्षणात जी फाईव्ह ने सर्व प्रतिस्पर्धी स्मार्टफोनला मागे टाकत टॉप पोझिशन मिळविली आहे. यात ऑलवेज ऑन डिस्प्ले तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. त्यासाठी ५.३ इंची क्वाडएचडी स्क्रीन दिला असून त्याच्या मदतीने फोनला टच न करताही वेळ, तारीख व बॅटरी स्टेटस जाणून घेता येते. या फोनला वेगवान स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर दिला गेला आहे.

अन्य फिचर्समध्ये ४ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज, कार्डच्या सहाय्याने ते वाढविण्याची सुविधा, १६ एमपी व ८ एमपीचा रियर कॅमेरा वाईड अँगल लेन्ससह आहे तर ८एमपीचा सेल्फी कॅमेराही आहे. वाईड अँगल लेन्समुळे लँडस्केप्स, उंच इमारती कॅप्चर करणे सहज सोपे झाले आहे. कनेक्टीव्हीटीत फोरजी सह एलटीई, टाईप सी यूएसबी, एनएफसी, ब्ल्यूटूथ, अशी ऑप्शन्स असून हा फोन अँड्राईड मार्शमेलो ६.० वर चालतो. सिल्व्हर, गोल्ड, पिंक आणि टायटन कलरमध्ये तो उपलब्ध आहे.

Leave a Comment