परदेशात घटस्फोटही सेलिब्रेट करण्याची क्रेझ

divorce
पाश्वात्य देशात अनेकवेळा लग्न करणे व घटस्फोट घेणे ही नित्याची घटना आहे. लग्न आनंददायी समारंभ असला तरी घटस्फोट दुःखदच असणार अशी आपली कल्पना असेल तर हे वाचा. अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशात लग्नाप्रमाणेच घटस्फोटही सेलिब्रेट करण्याची क्रेझ वाढली असून त्याचा सर्वाधिक फायदा बेकरीवाल्यांना होताना दिसत आहे.

पाश्चात्य विवाहात केकला अनन्यसाधारण महत्त्व असते. किती पैसे खर्च करायची तयारी आहे त्यानुसार महागडे, स्पेशल वेडिंग केक तयार केले जातात. केक कापल्याशिवाय तेथे विवाह संपन्न होत नाही. आता मात्र घटस्फोट घेणारी जोडपीही एकमेकांना केक देऊन घटस्फोट सेलिब्रेट करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. घटस्फोटाच्या दुःखाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केकमधल्या गोडीने करण्याची ही फॅशन आहे म्हणे! या केकवर अनेक प्रकारचा मजकूर लिहीला जातो. उदाहरणार्थ मला नाही वाटत मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो/ करते, मला वाटते आपण आता दुसरा जोडीदार शोधावा, सिंगल अगेन अशा प्रकारचा हा मजकूर असतो आणि या असल्या केकसाठीही भरमसाठ किंमत मोजण्याची लोकांची तयारी आहे हे विशेष .