२०० वर्ष जुन्या कंडोमची ४६ हजारांना विक्री

condom
मुंबई: आज बाजारातील कंडोमची किंमत अनेकांना माहिती असते. पण एक कंडोम ४६ हजार रूपयांनाही विकला जाऊ शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा कंडोम इतका महाग विकला जाण्यामागचे काय कारण? जवळपास २०० वर्ष जुना हा कंडोम असल्याचे बोलले जात आहे. या कंडोमचा नुकताच लिलाव करण्यात आला असून तब्बल ४६ हजार रूपयांना हा कंडोम स्पेनमध्ये विकला गेला आहे. हा कंडोम शेळ्यांच्या आतडींपासून तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

ऑनलाईन पद्धतीने या कंडोमचा लिलाव करण्यात आला आहे. हा कंडोम अतिशय दुर्मिळ असल्याचे देखील बोलले जात जात आहे. इंग्लंडमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, लिलाव करण्यात आलेला कंडोम स्पेनच्या एका नगरात बॉक्समध्ये मिळाला होता. हा कंडोम घेण्यासाठी अनेकजण पुढे आले होते. अ‍ॅम्स्टरडॅमच्या एका व्यक्तीने हा कंडोम विकत घेतला आहे. फ्रांसमध्ये मिळालेला एक कंडोम १९ सेंटीमीटर लांब असून तो जगातला सर्वात महाग कंडोम मानला जातो. असे म्हणतात की, २०० वर्षआधी कंडोम बनवण्यासाठी खूप खर्च आणि खूप जास्त वेळ लागत असल्याने तेव्हा फक्त श्रीमंत लोकच कंडोमचा वापर करायचे.

आताच्या जमान्यात कंडोम साधारण १५ सेंटीमीटर लांब असतात. १९ व्या शतकात स्वस्त आणि रबरापासून तयार करण्यात येणारे कंडोम बाजारात दाखल झाल्याने शेळ्यांच्या आतंड्यांपासून तयार करण्यात येणारे कंडोम बंद झाले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे वापरलेला कंडोम इतक्या महाग विकल्या जाण्याची ही पहिलीच घटना नाही आहे. याआधी असा एक वापरलेला कंडोम खूप जास्त पैसे मोजून विकला गेला आहे.

Leave a Comment